Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वयोवृद्धाच्या आरोग्य सेवेसाठी सरसावल्या महापौर !

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या चार महिन्यापासून कोविड योद्धा म्हणून दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या महापौरांच्या तत्परतेने आज पुन्हा एकदा वयोवृद्धाला वेळीच उपचार मिळाले आहे. गेल्या चार दिवसांपासून घरात एकटेच असलेल्या आजोबांची समजूत घालत महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. महापौरांनी वृध्दाच्या विदेशात राहत असलेल्या मुलाशी देखील व्हिडीओ कॉलने संपर्क करून याबाबत माहिती दिली आहे.

चार दिवसापासून केला अन्नत्याग
एसएमआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात एक ६५ वर्षीय आजोबा राहतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून मुलगा विदेशात असल्याने ते घरी एकतेच असतात. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती त्यातच ताप आला असल्याने कोरोनाच्या भीतीने त्यांना गाठले. मनात सतत विचारचक्र सुरू असल्याने त्यांनी गेल्या चार दिवसापासून अन्न सेवन केले नव्हते.

नागरिकांनी महापौरांशी केला संपर्क
वृद्धाचे जालना येथे राहणाऱ्या एका भावाने याबाबत जळगावातील एका मित्राशी संपर्क केला. त्यांनी सदर बाब किशोर पाटील यांना कळविली असता तात्काळ महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याशी संपर्क केला.

महापौरांनी स्वतः काढली समजूत
वृद्धाची प्रकृती ठीक नसल्याचे कळताच महापौर सौ.भारतीताई सोनवणे यांनी तात्काळ डॉ.मनिषा उगले यांच्यासह रुग्णवाहिका त्यांच्या घरी पाठवली. डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकाने विनंती केल्यावरही वृद्ध आजोबा दवाखान्यात जाण्यास तयार झाले नाही. रविवारी सकाळी महापौर सौ.भारतीताई सोनवणे स्वतः डॉक्टर आणि रुग्णवाहिका घेऊन त्यांच्या घरी पोहचल्या. वृध्दाच्या मुलाने व्हिडीओ कॉलद्वारे आणि महापौरांनी प्रत्यक्षात वृद्धाची समजूत काढली.

कोविड केअर सेंटरमध्ये केले दाखल
महापौर सौ.भारती सोनवणे या रुग्णवाहिकेसह वृद्धाला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन आल्या. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी त्यांना लागलीच उपचारार्थ दाखल करून घेण्यास सांगितले. तसेच आजोबांना चहा, नाश्ता, बिस्किटे देखील देण्याचे सांगितले. महापौरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे एका वृद्धाला वेळीच उपचार मिळाले आहे.

Exit mobile version