Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वनोली श्री साईबाबा मंदीर तीर्थक्षेत्री महापुजा व महाप्रसादाचा कार्यक्रम

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र वनोली तालुका यावल येथील श्री साईबाबा मंदिर तीर्थक्षेत्र महापूजेचा कार्यक्रम, मान्यवरांचा भव्य नागरिक सत्कार व विकास कामांचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वनोली तालुका यावल येथे सोमवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता राज्याचे ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे, जळगाव आ.राजू मामा भोळे, रावेर आ. शिरीष चौधरी, भुसावळ आ.संजय सावकारे, चोपडा आ.लताताई सोनवणे, मुक्ताईनगर आ.चंद्रकांत  पाटील, अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.साईबाबा तीर्थक्षेत्र वनोली श्री.साईबाबा मंदिरात महापूजन झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा व आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा भव्य नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दर्शनार्थ येणाऱ्या भावी भक्तांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन श्री साईबाबा तीर्थक्षेत्र वनोली ता.यावल यांनी केले आहे.

महाप्रसादाची वेळ संध्याकाळी ८ वाजेपासून राहणार असल्याची माहीती आयोजक श्री साईबाबा तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अध्यक्ष, हिरालाल व्यंकट चौधरी व संचालक मंडळ वनोली तालुका यावल यांनी दिली आहे.

Exit mobile version