Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वड्री आसराबारी परीसरात वनविभागाने केली विविध फळरोपांची लागवड

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आसराबारी या गावपाडयावर वनविभागाच्या विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

 

यावल वनविभाग जळगाव, वनक्षेत्र यावल पुर्व यांच्या वतीने आज दि. ७ जुलै रोजी मौजे आसराबारी (वड्री खु. ) ता. यावल या ८० ते ९० झोपड्या असलेले आदिवासी वस्तीवर मागील वर्षी १२ जुलै रोजी आढळून आलेल्या कुपोषित बालकाचे जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान दुदैवी निधन झाले होते. याच पार्श्वभूमीवर कुपोषणाचे गांभीर्य लक्षात घेता या वर्षी त्या वस्तीवर जंगलात वास्तव्यास राहणारे आदिवासी महिला व चिमकुल्या बाळांना पोषक घटक मिळणारे शेवगा, आंबा, सिताफळ, आवळा, जांभूळ, रामफळ व इतर फळझाडांची रोपांचे वनविभाग यांचेकडून वन महोत्सवच्या निमित्ताने दि. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत वृक्ष लागवड करिता १ जुलै ते ७ जुलै वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे औचित्य साधून वस्तीवरील सर्व कुटुंबांना तहसीलदार महेश पवार, पुर्व क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर , वड्री गावाचे सरपंच अजय भालेराव , उपसरपंच पंकज चौधरी , ललित चौधरी अध्यक्ष वन संरक्षण समिती यांचे हस्ते रोपे वाटप करण्यात आले. तसेच रोप लागवड करून साप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांनी वन महोत्सव कार्यक्रमाचे आणि कुपोषण मुक्त करिता वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमास वनपाल रविंद्र तायडे , वनरक्षक गोवर्धन डोंगरे, वनरक्षक कृष्णा शेळके, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड, संदीप चौधरी, फकिरा तडवी, जवानसिंग पावरा, देवीसिंग पावरा, गुड्ड पावरा उपस्थितीत होते.

Exit mobile version