Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वडजी येथील शाळेत मराठा भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भडगाव तालुक्यातील वडजी येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल येथे मराठा भाषा गौरव दिन वेशभुषेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी मृणाली गायकवाड, प्रणया पाटील, सरुज्ञा पाटील, मानसी परदेशी, हर्षदा मोरे, राजश्री पगारे, भाग्यश्री पाटील यांनी वेशभुषेसह संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. हर्षल परदेशी, ध्रूप पाटील, श्रेयश पाटील, मयुर पाटील, समर्थ पाटील, निखिल पाटील, अमोल पाटील, सिद्धेश पाटील व संघर्ष मोरे या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी व मराठी महाराष्ट्राच्या वेशभुषेसह यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिल पाटील यांनी मराठी भाषा गौरव दिवस हा थोर लेखक,कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांनी लिखान केलेले साहित्य व जीवनपट याविषयी माहिती सांगीतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल सोनवणे तर आभार सुषमा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य अनिल पाटील, शिक्षिका सुषमा पाटील, कोमल सोनवणे, महेंद्र मोरे, शिक्षक-शिक्षिका-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version