Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वखार महामंडळमधील वाहक किशोर पाटील सेवानिवृत्त

 

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामध्ये वाहक पदावर कार्यरत किशोर धर्मराज पाटील सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक येथील महाराष्ट्र वखार महामंडळात कार्यरत किशोर धर्मराज पाटील हे नियमित वयोमानाप्रमाणे 30 मे रोजी सेवानिवृत्त झालेत. त्यांना सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ नाशिक विभागीय व्यवस्थापक अजित मासाळ, प्रोग्रामर उगले, उपव्यवस्थापक अभियांत्रिकी उंबरकर किशोर पाटील यांना सेवानिवृत्तीच्या मनपुर्वक शुभेच्छा दिल्यात.

Exit mobile version