Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘वक्फ कायदा’ रहित करा; धरणगावात हिंदूत्वावादी संघटनांचे निवेदन 

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशविरोधी वक्फ कायदा त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघाटनेच्या वतीने धरणगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत. संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा वरकरणी आहे. परंतू या ‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्ती देखील सहज बळकावता येते. हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, संविधानविरोधी काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा.

यावेळी हातात फलक घेऊन कायदा रहित करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड कायद्या’त केलेल्या सुधारणेमुळे हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि अन्य गैर मुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचे अत्यंत भयानक अधिकार मिळाले आहेत. वक्फ कायदा रद्द करावा, वक्फ बोर्डाने अधिग्रहित केलेल्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी निवेदन देताना साहेबराव माळी, रोहन भाटीया,हेंमत दुतिया,अँड हर्षल चौव्हाण,इच्छेश काबरा,कातिलाल माळी,सुभाष पाटील,सनातन संस्था,किरण माळी धर्मप्रेमी,प्रल्हाद सोनवणे – धर्मप्रेमी,विनोद शिदे -हिंदु जनजागृती समितीचे आदी उपस्थित होते.

Exit mobile version