वकील संघाची अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करण्याची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील वकील संघाकडून चाळीसगाव येथील वकीलावर हल्ल्याचा जाहीर निषेध करून अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिलास मंजुरीची मागणी निवासी नायब तहसिलदार आर. के. पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, आम्ही वकील हे न्यायालयामध्ये पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत असतो. पक्षकारांना न्याय मिळवुन देत असतो. सदर काम करीत असतांना अनेकदा विरुध्द बाजुच्या पक्षकारांनकडुन धमक्या मिळत असतात. अशा परिस्थितीत देखील वकील मंडळी कोणतीही भिती न बाळगता त्यांचे व्यावसायीक कार्य पार पाडत असतात. दरम्यान हे काम करत असतांना नुकतेच चाळीसगाव येथील न्यायालयामध्ये अॅड. सुभाष टी.खैरनार या वकीलावर संशयीत आरोपी किसन मोतीराम सांगळे याने थेट अंगावर पेट्रोल टाकुन त्यांना पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा चाळीसगाव वकील संघातील सहकारी वकील बांधवांनी प्रसंगावधान दाखवुन सदर इसमाला थांबवले. त्यामुळे अॅड. खैरनार यांचा जिव वाचला, परंतु त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे. तेव्हा ही घटना निषेधार्थ असुन अश्याच प्रकारे जर वकीलांबर हल्ले होत गेले तर वकील बांधवांना योग्य प्रकारे न्यायालयीनकाम करणे शक्य होणार नाही व त्यांना नेहमी भितीचे वातावरणात काम करावे लागेल. तेव्हा या घटनेतील संशयीत किसन सांगळे यास कठोर शासन व्हावे व शासनाने देखील वकिलांच्या संरक्षणासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिलास तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे निवेदन देते प्रसंगी वककील संघाचे अध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, सचिव निलेश मोरे, अॅड. राजेश गडे, अॅड. अशोक सुरळकर, अॅड. के. डी. सोनवणे, अॅड. विनोद परतणे, अॅड. याकुब तडवी, अॅड. देवंद्र बाविस्कर, अॅड. के. डी. सोनवणे, अॅड. डी. सी. सावकारे, अॅड. जी. एम. बारी, अॅड. एन. एम. चौधरी, अॅड. निवृत्ती पाटील, अॅड. प्रितम मेढे, अॅड. के. डी. पाटील, अॅड. राजेश बारी, अॅड. उमेश बडगुजर, अॅड. आकाश चौधरी, अॅड. अजय कुळकर्णी, अॅड. एस. जी. कवडीवाले, अॅड. सुलताना तडवी, अॅड. खालीद शेख, अॅड. गौरव पाटील,  अॅड. दत्तात्रय सावकारे सह आदींची उपस्थिती होती.

Protected Content