Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वकीलाची २० हजार रूपयात ऑनलाईन फसवणूक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  लाईट बिल अपडेट करण्याच्या नावाखाली शांतीवन कॉलनीतील गजानन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या वकीलाला २० हजारात ऑनलाईन गंडविल्याची घटना शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी ८ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शांतीवन कॉलनीतील गजानन अपार्टमेंटमध्ये शिरीन गुलामअली अमरेलीवाला या वास्तव्यास असून त्या वकील आहेत. गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी  शिरीन यांना मोबाईलवर तुमचे लाईटबिल अपडेट नसून तुमची लाईट कट करण्यात येईल असा मॅसेज आला. तसेच त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर तात्काळ कॉल केला. मात्र त्यांचा कॉल कोणीही रिसीव्ह केला नाही. दरम्यान, शुक्रवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांना पुन्हा इलेक्ट्रीकसीटी ऑफीसमधून फोन आला असता, अमरेलीवाला यांनी त्याला मी लाईट बील भरले असून तुम्ही मला परत का सांगत आहे. अशी त्यांनी विचारणा केली.

त्यावर समोरील व्यक्तीने नवीन नियमानुसार तुम्हाला तुमचे बिल अपडेट करावे लागेल, असे त्याने सांगितले. त्यानुसार समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे अमरेलीवाला यांनी ॲप्लीकेशन लाऊनलोड करायला लावले. त्यानंतर त्यांच्या बँकेची संपुर्ण माहिती त्यामध्ये भरायला लावून दोन वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण २० हजारांची ऑनलाईन फसवणुक केली. आपली फसवणुक झाल्याचे कळताच शिरीन अमरेलीवाला यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version