Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वंचित बहुजन आघाडीचे १२ ऑगस्ट रोजी राज्यभरात ‘डफली बजाव’ आंदोलन !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी येत्या १२ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करणार आहे.

 

राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. त्यासाठी, १२ ऑगस्ट रोजी राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफली वाजवून सरकारचा निषेध नोंदविण्यात येईल. या आंदोलनात कष्टकरी आणि रोजगार बुडालेल्या जनतेने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version