Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वंचितच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी मुलाखती

जळगाव, प्रतिनिधी । वंचित बहुजन युवा आघाडीचा युवा प्रदेश अध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय युवा मेळावयाचे आयोजन आज कान्ताई सभागृहात करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणी सदस्यांसाठी मुलाखत घेण्यात आली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या गावाला पाण्याची समस्या भेडसावत आहे म्हणून राज्य सरकारवर टीका करताना विश्वकर्मा म्हणाले की . दुटप्पी धोरण वापरनारे हे सरकार आहे. या राज्य सरकारच्या पलटू मंत्र्यांनी वीज धोरण जाहीर करून त्यापासून ते पालटले भाजपवर टीका करतांना ते म्हणाले की केंद्रात व महापालिकेत सत्ता देऊनही जळगावात मोठ मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे सर्व त्रस्त आहेत जनतेने यांना धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी केले .

निलेश विश्वकर्मा यांनी युवा जोडो अभियानांतर्गत आयोजित मेळाव्याबाबत सांगितले की, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी तरुण-तरुणींना युवा जोड अभियानांतर्गत वंचित आघाडीच्या माध्यमातून एक मोठा मंच उपलब्ध करून दिला आहे. तरुणांना राजकारण करण्याची संधी दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्यने तरुण-तरुणी मोठ्या उत्सहाने वंचित बहुजन आघाडीत येत आहेत. आम्ही जळगाव सुवर्णनगरीत व बहिणाबाई चौधरी यांच्या पावन भूमीत आलो आहोत येथे तरुणांमध्ये उत्साह आहे.

तरुणांना घेऊन महाराष्ट्र राज्याची मोट बांधण्याचे काम अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करणार आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे समाजातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. जळगावकरांना खड्ड्यांची समस्या भेडसावत आहे. जळगावच्या खड्ड्यात येथील आमदार देखील पडल्याची घटना घडली आहे. ही परिस्थिती आजही जैसेथे आहे. या लोकांना धडा शिकविण्यासाठी वंचित युवा आघाडी काम करेल असा विश्वास विश्वकर्मा यांनी व्यक्त केला. अंजली पाटील यांना भादली ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून देत जळगावने ऐतिहासिक निर्णय दिल्याने त्यांनी जळगावच्या जनतेचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी प्रदेश महासचिव राजेंद्र पाचोडे, जिल्हा निरीक्षक चेतन गांगुर्डे, जीतरत्न पटाईत, प्रदेश सदस्य शमिभा पाटील, जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे, महिला आघाडीच्या सुजाता ठाकूर, संगीता भांबरे, दिनेश शिकारे, देवदत्त मकासरे, दिगंबर सोनवणे, जितेंद्र केदार, अक्षय जोशी, भरत ससाणे, समीर शेख, दिनेश नेहते, राजेंद्र बारी, बंटी सोनवणे, राहुल सुरवाडे, विद्यासागर कदम, गणेश पगारे आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हास्तरीय युवा मेळाव्यात भादली ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघडीच्या विजयी उमेदवार अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version