Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोहारी येथील एकाची १८ हजारात फसवणूक

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील एका व्यक्तीला डेबीट कार्डच्या मदतीने १८ हजार रूपये एटीएम मधून परस्पर काढून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, ईश्वर बाजीराव जाधव (वय-५५) रा. लोहारी बु ॥ ता. पाचोरा हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २९ रोजी सकाळी १० वाजता ते कामानिमित्त पाचोरा शहरातील बसस्थानक परिसारात आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या एटीएमच्या डेबीट कार्डच्या नंबरच्या माध्यमातून परस्पर १८ हजार रूपये काढून नेल्याचे उघडकीला आहे. याप्रकरणी ईश्वर जाधव यांनी तातडीने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहे.

Exit mobile version