Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोणी येथील कोरोना संशयित तरूणीचा मृत्यू; १६ जण क्वारंटाईन

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील लोणी येथील १९ वर्षीय तरूणीचा खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक म्हणून संपर्कातील १६ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

याबाबत आज तालुकास्तरीय पथकाने लोणी येथे मृताच्या संपर्कातील व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग तपासणी केली. १६ लोकांना क्वांरटाईन करण्यात आले. यात जास्त संपर्कातील सहा तर कमी संपर्कातील १० जण आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून फत्तेपुर येथील सदर युवतीवर आधी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेट देऊन सविस्तर माहिती घेण्यात आली. व तो दवाखाना निर्जंतुक करण्यासाठी ३ दिवस सिल करण्यात आला आहे.तसेच फत्तेपुर येथील लॅब च्या एका रक्त संकलकाला सुद्धा कोरंटाईन करण्यात आले आहे.

आरोग्य सेविका प्रतिभा वानखेडे, आरोग्य सेवक कृष्णा शिंदे, अनिता वाघ, कल्पना सुरळकर, भारती आहेर व रेखा चिकटे यांनी पर्यवेक्षक भागवत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व घरांचा तापाचा सर्वे करण्यात केला. यामध्ये एकूण ३०० व्यक्तींचा सर्वे करण्यात आला असून यात ३ व्यक्तींना किरकोळ ताप आढळून आला.

तालुकास्तरीय पथकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत, डॉ.योगेश राजपूत, डॉ.कुणाल बावस्कर, डॉ.सागर सोनाळकर, डॉ. किरण धनगर, डॉ. धनंजय राजपूत, व्ही.एच.माळी, बशीर पिंजारी यांचा समावेश होता. गावात ग्रामपंचायतीच्या वतीने फवारणी करण्यात येत आहे.

Exit mobile version