Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोणी कुणबी पाटील समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील लोणी कुणबी पाटील समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी व पदवीधर, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी उपमहापौर तथा नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक डॉ. विरेंद्र खडके, सामाजिक कार्यकर्ते भरत कोळी, जीवन विकास केंद्राचे डॉ. विकास निकम, शिक्षक संजय सावळे, नगरसेवक अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते पियुष कोल्हे, शंकर पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती मलकापूर छाया पाटील, बी. टी. पाटील, लोणी कुणबी पाटील समाजाचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, सचिव तुषार पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सहसचिव मनोज पाटील, संचालक गणेश पाटील, पंकज पाटील, डिगंबर पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने करण्यात आली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजात उत्कृष्ट काम करणारे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्य स्तरीय रजत पदक मिळवणारे कळमसरा येथील धीरज पाटील, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पाटील, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे मलकापूर येथील शिक्षक संजय सावळे, उत्कृष्ट फोटोग्राफीबद्दल शिंदाड येथील छायाचित्रकार संदीप बोरसे यांच्यासह समाजहितासाठी देणगी देणाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

“यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रतिपादन केले की, समाज हितासाठी आपण काही देणे लागतो या भावनेने संस्कार जोपासत कार्य करावे. तसेच समाजाने आपल्याला भरपूर काही दिलं आहे. समाजाने केलेला सत्कार म्हणजे पाठीवर मिळालेली प्रेमाची थाप. यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे. तसेच लोणी कुणबी पाटील समाजाच्या जागेसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन देखील आमदार भोळेंनी दिले.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता ठाकरे तर आभार प्रदर्शन धनंजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version