Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोखंडी सुरा घेवून दहशत माजविणाऱ्या तरूणाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील पायघन हॉस्पिटल समोर बेकायदेशीररित्या हातात लोखंडी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून लोखंडे सुरा हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार तलवारी, सुरे लाठ्याकाठ्या सोबत बाळगण्याची परवानगी दिलेली नसताना जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील पायघन हॉस्पिटल समोर संशयित आरोपी आकाश उर्फ मट्या अनिल बागडे (वय-२८) रा. संजय गांधी नगर, जाखणी नगर, जळगाव हातात लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रात्री ८ वाजता संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याबाबत रात्री १० वाजता पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश उर्फ मट्या अनिल बागडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे करीत आहे

Exit mobile version