Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोखंडी पट्टी डोक्यात मारल्याने तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे भाच्याला भेटण्यासाठी आलेल्या तरूणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण करत लोखंडी पट्टी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तौसिफ शेख सलीम काकर (वय-३२) रा. पोलीस कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मयत झालेली चुलत बहिणीच्या मुलांना भेटण्यासाठी रविवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता तौस‍िफ उस्मानिया पार्क येथे गेला होता. याचा राग आल्याने शरीफ रहेमान काकर रा. तांबापूर, भिकन सलीम काकर, शाहरूख उर्फ गुड्डू सलिम काकर, आणि सलिम नजिर काकर सर्व रा. उस्मानिया पार्क यांनी तौसीफला बेदम मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पट्टी डोक्यात टाकल्याने तौसिफ गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तौसिफने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शरीफ रहेमान काकर रा. तांबापूर, भिकन सलीम काकर, शाहरूख उर्फ गुड्डू सलिम काकर, आणि सलिम नजिर काकर सर्व रा. उस्मानिया पार्क यांच्यावर सोमवारी २४ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version