Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोखंडी कुकरी घेवून फिरणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरातील भीमा कोरेगाव चौकात हातात लोखंडी कुकरी घेवून दहशत पसरविणाऱ्या संशयित आरोपीला गुरूवारी २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता  शहर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसरातील भीमा कोरेगाव चौकात संशयित आरोपी महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय-२१) रा. गेंदालाल मील, जळगाव हा हातात लोखंडी कुकरी घेवून परिसरात दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांना‍ मिळाली. त्यानुसार पोलीस शोध पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस कर्मचार पोहेकॉ भास्कर ठाकरे, पो.कॉ. अमोल ठाकूर यांनी गुरूवार २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी महेश उर्फ मन्या लिंगायत याला अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी कुकरी हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी  आरोपी महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत यांच्या विरोधात रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.

Exit mobile version