Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन (व्हिडिओ )

जळगाव,प्रतिनिधी । अखिल भारतीय मातंग समाजाच्या  वतीने आज(दि.१) सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील नेरी नका चौकात १०१ व्या  जयंतीनिमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.  महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष  मुकुंद सपकाळे ,  राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीसअशोक पाटील ,  माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, माजी नगरसेवक  सुनील माळी , छावा मराठा युवा महासंघ जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे ,  माजी नगरसेवक राजु मोरे  , विशाल देशमुख ,सतीष गायकवाड , अनिल पवार व मित्रपरिवार . यावेळी मुकुंदभाऊ सपकाळे यांनी उपस्थितांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व कार्याविषयी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान याबद्दल माहीती दिली . “लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो ” ” भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ” या घोषणा देण्यात आल्या .

 

 

यावेई  समाज बांधव  सतीश गायकवाड, बंटी खरात, नरेंद्र गायकवाड मनोज बोदडे, तानाजी खरात,  मनोज सपकाळे , दीपक गायकवाड आदींची उपस्थिती होती.   अखिल भारतीय मातंग समाज  व  लहूजी ब्रिगेडतर्फे देखील अभिवादन करण्यात आले.

फेसबुक व्हिडीओ लिंक

भाग-१

भाग-२

Exit mobile version