Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोकरंग फाउंडेशन , शाहीर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

 

पाचोरा, प्रतिनिधी ! भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शाहीर परिषद शाखा जळगाव व खानदेश लोकरंग फाउंडेशनकडून  नगरदेवळा ( ता. पाचोरा )  येथे आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

 

 

याप्रसंगी महाराष्ट्र शाहीर परिषद  जळगाव जिल्हा अध्यक्ष व लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा फुले यांच्याही प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता , बंधुता या शिकवणीचा समाजाने आदर्श घ्यावा व जीवन समृद्ध करावे असे सांगत या  महामानवांनी केलेल्या कार्याचा विस्तृत आढावा शाहीर शिवाजीराव पाटील यांनी  ओघवत्या शैलीत उपस्थित कलावंतांसमोर सादर केला.

 

कोरोना काळातील सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे स्थानिक जिल्हा शाखा कार्यालयात  झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला शाहीर नामदेव पाटील, शाहीर बाबुराव मोरे, भाऊराव महाजन, शाहीर भागवत महाजन, गोकुळ म्हसकर, योगेंद्र राऊळ, सुरज राऊळ, मिलिंद शेडगे आदी स्थानिक कलावंत उपस्थित होते.  प्रास्ताविक व सूत्रसंचालन भूषण पवार यांनी केले उपस्थितांचे आभार भागवत महाजन यांनी मानले.

Exit mobile version