लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजबांधवांचे अभिवादन (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना राजकीय वारसा मिळालेला नसताना त्यांनी कर्तुत्व, नेतृत्व आणि अभ्यासूबाणाच्या जोरावर महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली होती. मुंडे साहेब कायम अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

 

दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी ३ जून रोजी मेहरुणमधील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे जेष्ठ नेते, माजी महापौर नितीन लढढा, माजी महापौर सीमाताई भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, शोभाताई चौधरी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त केले.

नितीन लढ्ढा यावेळी म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांच्यामध्ये राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्‍वास, संयम प्रचंड होता. नवे विचार, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची नेहमीच तयारी असायची. उपेक्षित ,शोषित वर्गामध्ये त्यांनी नवीन विश्वास निर्माण केला, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कुसूंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, नामदेव वंजारी, सुखदेव पाटील, महारु सांगळे, शिवदास घुगे, सलमान खाटीक, अंबादास घुगे, तेजस वाघ, गौरव घुगे, कल्पेश वाघ, किरण नाईक, महादू सोनवणे, मिलिंद आंधळे, कुणाल सानप, अनील घुगे, भागवत पाटील, संतोष पाटील, निलेश घुगे पाटील, किरण वाघ, योगेश घुगे, राजेंद्र पाटील, एकनाथ वंजारी, धर्मेंद्र नाईक, योगेश लाडवंजारी, राहुल सानप, संतोष चाटे, गोविंदा सांगळे, रामेश्वर पाटील, एकनाथ वाघ, वासुदेव सानप, रामेश्वर पाटील, उमेश वाघ, प्रमोद नाईक, वासुदेव देशमुख, ज्ञानेश्वर नाईक, बाळू गुरुजी आदींनी परिश्रम घेतले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/436116375013271

 

Protected Content