Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोंढे येथे आत्मा अंतर्गत शिव समर्थ शेतकरी गटाची स्थापना

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढे येथे आत्मा अंतर्गत शिव समर्थ शेतकरी गट आज स्थापन करण्यात आले असून सदर गटाने विकेल ते पिकेल संत शिरोमणी सावता माळी अभियानात सहभाग घेतला आहे.

तालुक्यातील लोंढे येथील आत्मा अंतर्गत शिव समर्थ शेतकरी गट आज स्थापन करण्यात आले. सदर गट हा अध्यक्ष शिवाजी निलकंठ निकम यांचा आहे. विकेल ते पिकेल संत शिरोमणी सावता माळी अभियानात सहभाग घेतला आहे. या गटाने कुंदन जातीचे खरबूज तीन एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. या खरबूजांना 30 रुपये प्रति किलोने जागेवर घेतले जात असून सदर माल हा सौदी अरेबिया येथे एक्स्पोर्ट केला जात आहे. जवळपास 15 टन माल निघण्याचे प्राथमिक अंदाज अध्यक्ष शिवाजी निलकंठ निकम यांनी वर्तविला आहे. पीकाचे पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, कृषी मंडळ अधिकारी सूर्यवंशी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते. तसेच विकेल ते पिकेल प्रकल्पास जळगाव जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जळगाव जिल्हा कृषि उपसंचालक अनिल भोकरे , डेप्युटी उपसंचालक आत्मा दोन मधुकर चौधरी व कुर्बान तडवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version