Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊन ४ : रेड झोन वगळता बस,टॅक्सी वाहतुकीस मुभा ; राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) पहिल्या तीन लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने रेड झोनच्या बाहेर बस,टॅक्सी वाहतुकीस मुभा दिली आहे.

 

सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने लॉकडाउनचे नियम थोडे शिथिल केले आहेत. त्यानुसार रेड झोनच्या बाहेर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस,टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. तर मुंबई महानगरसह मालेगाव, औरंगाबाद,धुळे,अकोला, जळगाव,अमरावती, पुणे,नाशिक, सोलापूर महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रेड झोनमध्ये दुकानं, मॉल्स, कारखाने खुली करण्याची परवानगी. केवळ देखभालीसाठी खुली करण्यात यावी. मात्र मॉल्समध्ये सामानांची विक्री केली जाणार नाही. ही दुकानं सकाळी 9 ते 5 पर्यंत खुली राहतील. तसेच मैदानं, स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणं देखील सुरू करण्यात येतील. मात्र कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. रेड झोनमध्ये टॅक्सी, रिक्षा किंवा कॅबना परवानगी नाही. बस या फक्त रेड झोन नसलेल्या परिसरात चालवल्या जातील. रेड झोन नसलेल्या परिसरांमध्ये रिक्षांसाठी चालक वगळता केवळ 2 लोकांना बसण्याची परवानगी असेल. तर, चारचाकीसाठी चालक वगळता 2 लोकांना प्रवास करण्याची परवानगी असेल.

Exit mobile version