Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊन : केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमुळे पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा वाढलेला ताण आणि रमजान ईद, पालखी सोहळा, गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी आज केंद्रीय पोलीस दलाच्या दहा तुकड्या महाराष्ट्रात पोहोचल्या आहेत. आजपासूनच या दहा तुकड्या राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत.

 

राज्यात दाखल झालेल्या या तुकड्यांमध्ये ५ रॅपिड अॅक्शन फोर्स, ३ तुकड्या सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या २ तुकड्या दाखल झाल्या आहेत. एका तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्या आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकलेल्या पोलीस यंत्रणेच्या मदतीसाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या मागवल्या जातील असे संकेत दिले होते. त्यानुसारच निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या राज्यात पाचारण करण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.

 

Exit mobile version