Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमुळे मे महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

lokshai din

lokshai din

जळगाव प्रतिनिधी । प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. माऋ कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याचा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात ३ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे मे २०२० मधील पहिल्या सोमवारी होणारा ४ मे, २०२० चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Exit mobile version