Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट देण्यात आली असून संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मुद्रांक अधिकारी विजय भालेराव यांनी आज प्रसिध्दीपत्रकातून दिले आहे.

सविस्तर माहिती अशी की, एप्रिल २०२० ते मे २०२१ दरम्यान जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे नोंदणी न झालेल्या दस्तावरील नोंदणी फीच्या दंडात सुट देण्याचे शासनाने निश्चित केले आहे. डिसेंबर, 2020 मध्ये शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीमुळे स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पुर्ण झाले परंतु लॉकडाऊनमुळे एप्रिल 2021 व मे 2021 या महिन्यामध्ये नोंदणी न झालेली हस्तांतरण व विक्री करारनामा या दस्तावरील नोंदणी फीच्या दस्तांमध्ये प्रथम दोन महिन्यासाठी आणि जानेवारी, 2021 मध्ये स्वाक्षरी व अंगठ्याचे ठसे दस्तावर पुर्ण झाले परंतु नोंदणी न झालेले दस्त व अशा दस्तांवरील नोंदणी फीचा दंड जो नोंदणी फी रक्कमेच्या कमीतकमी अडीच पट व जास्तीत जास्त दहा पट इतका आहे, तो कमी करुन शासनाने एक हजार रुपये इतका निश्चित केला आहे.

या कालावधीत यापूर्वी दंडाचा भरणा करुन दस्त नोंदणी केली असल्यास दंडाचा परतावा मिळणार नाही. शासकीय परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान उद्या शनिवारी 26 जून, 2021 रोजी फक्त अशाच प्रकारचे दस्त नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये उघडी ठेवण्यात येणार आहे. तरी संबंधीतांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version