Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ ; सलून व्यावसायिकाचा मुलासह आत्महत्येचा प्रयत्न

सांगली (वृत्तसंस्था) कोरोनामुळे दोन महिन्यापासून दुकान बंद असल्यामुळे आर्थिक विवंचनेतून एका सलून व्यावसायिकाने मुलासह आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक इरळीत घडली आहे. दरम्यान, या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

 

गेले तीन महिने लॉकडाऊनमुळे सलून व्यवसाय बंद आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. याच तणावातून नवनाथ उत्तम साळुखे (३५) असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याने आपला मुलगा अजय साळुखे (४) सह विषारी औषध प्राशन केले. या दोघांनाही सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे नवनाथ साळुखे यांचे सलून व्यावसायिक असून पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version