Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमध्ये पिंटू कोठारी यांची जनसेवा; अन्नदानासह गरजूंना मदत

भुसावळ संतोष शेलोडे । एकीकडे लॉकडाऊनमध्येही स्थानिक पातळीवर राजकारण सुरू असतांना नगरसेवक निर्मल उर्फ पिंटू कोठारी यांनी अविरतपणे गोर-गरिबांची सेवा सुरू केली आहे. यात उपासमार होत असलेल्यांना अन्नदान, गरजूंना अत्यावश्यक सेवांची मदत व आरोग्य तपासणी अशा अनेक प्रकारे मदत केल्याने ते अनेकांसाठी देवदूत ठरले आहेत.

देशामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे.अशावेळी कोरोनाग्रस्त रुग्णाची ढाल बनून डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी कोरोनाला हद्दीपार करण्यासाठी लढा देत आहे.तसेच सोबत खांद्याला खांदा लावून समाजिक कार्यकर्ते आपल्या परीने सेवा करीत आहे. या पार्श्‍वभूमिवर येथील साई भक्त तथा नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी हे गरजूंसाठी देवदूत ठरले आहे. त्यांनी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही दिवसांपासून अन्नछत्र सुरू केले आहे. या माध्यमातून दररोज हजार ते बाराशे लोकांची फराळासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जे परप्रांतीय हायवे ने पायी येत आहे त्यांच्यासाठी हायवे रोडवर स्वतंत्र मंडप उभारण्यात आलेल्या आहे.याठिकाणी पायी येणार्‍यांना जेवण ,पाणी तसेच झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.जे परप्रांतीय रस्त्याने येत आहे अशांची थर्मामिटर ने तपासणी केली जात आहे.त्यानंतर त्यांना जेवण दिले जात आहे. पायी चालतांना त्रास होत असल्याने यावर उपाय म्हणून औषधी देखील दिली जात आहे.

सध्या भुसावळाचे तापमान चाळीशीच्या पार पोहचले आहे अशा या तापलेल्या वातावरणात मोटरसायकल डोक्याला पांढरा रुमाल लावून साई भरोसे सोबत एक मारुती व्हॅन जेवणाचे पार्सल घेऊन फिरत आहे.या दरम्यान जर कोणी पादचारी पायी येताना दिसल्यास आपली मोटरसायकल थांबवून परप्रांतीय मुलांना जेवण दिले जात आहे. याचा आजवर हजारोंनी लाभ घेतला आहे. यातील अनेक जण आपल्या घरी पोहचल्यानंतर त्यांना कॉल करून याची माहिती देत असतात.

पिंटू कोठारी यांनी आधी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे. आता लॉकडाऊन सारख्या आपत्तीतही एकीकडे भुसावळमध्ये राजकीय कुरघोड्या सुरू असतांना कोठारी यांच्या जनसेवेचा आदर्श सर्वांनी घ्यावा हे अपेक्षित आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version