Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनचे उल्लंघन : चार दुकानदारांवर भुसावळात कारवाई

FIR

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून विहीत कालावधीपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवणार्‍या शहरातील चार दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या आदेशानुसार स.फै.अनिल अडकमोल, चालक पो कॉ दिनेश कापडणे, पो कॉ विकास सातदिवे,पो कॉ प्रशांत परदेशी असे संचार बंदीचे नियमन करण्यासाठी सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. याप्रसंगी नगरपरिषद प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ आपली दुकाने सुरू ठेवून गर्दी जमावल्याने शेख अब्दुला शेख रऊफ जुनेद किराणा खडका रोड ,सुनील दिनकर बर्‍हाटे अमर प्रॉव्हिजन श्रीराम नगर, अब्दुल हमीद अब्दुल वसीम फरहान कोल्डिंग ग्रीन पार्क, अनिल नंदकिशोर शर्मा विग्नहर्ता प्रॉव्हिजन गांधी नगर भुसावळ असे चार दुकानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल करण्याचे काम सुरू असून नगर अभियंता पंकज पन्हाळे नगरपरिषद भुसावळ यांच्या ताब्यात कारवाईसाठी देण्यात येणार आहे.

Exit mobile version