Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाउन : सांगली येथे सामूहिक नमाज पठणासाठी एकत्र आलेले ३६ जण ताब्यात

सांगली, वृत्तसेवा । देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेले असतांना सामूहिक नमाज पठण करण्यासाठी एकत्र आलेल्या ३६ जणांना पोलिसांनी मिरजमध्ये ताब्यात घेतलं आहे. व्हॉट्सअपवरुन मेसेज करत सर्वांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जमण्यास सांगण्यात आलं होतं. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तिथे पोहोचून छापा टाकून ताब्यात घेण्याची कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील मच्छी मार्केट येथे असणाऱ्या बरकत मशिदीत सामूहिक नमात पठण केलं जात होतं. यावेळी पोलिसांनी छापा टाकून ३६ जणांना ताब्यात घेतलं. डीवायसी संदीप सिंह गिल आणि पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी ही कारवाई केली. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून सर्वांना नमाजासाठी बोलावण्यात आलं होतं. ताब्यात घेतलेल्या सर्व जणांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं असून कायदेशीर कारवाई केली जात आहे. सोबतच या सर्वांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मौलवींच्या माध्मामातून त्यांना समजावलं जात आहे. माजी नगरसेवक साजीद अली पठाण हेदेखील तिथे उपस्थित आहेत.

Exit mobile version