Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाउन : केंद्र सरकारची नियमावली जारी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु राहणार आहे. या काळात कोणाला सूट मिळणार, काय नियम असणार याबाबत मार्गदर्शन करणारी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नियमावलीनुसार, सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार. संपूर्ण देशात २० एप्रिलपर्यंत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान सांगितले होते.

Exit mobile version