Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाउनमुळे पुन्हा प्रदूषण घटले

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अत्यावश्यक वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद आहे. यामुळे काही दिवसात प्रदूषणात कमालीची घट झाली आहे.

 

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे हवेत उडणारे सुक्ष्म कण नष्ट झाले आहेत. प्रदूषणात कमालीची घट झाल्याने आता दृश्यमानता वाढली आहे. त्यामुळे सहारनपूरमधून थेट हिमालयाची शिखरं दिसू लागली आहेत. थेट हिमालयाचं दर्शन होत असल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. लांबून घेतलेले हिमालयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

सहारनपूर देहरादूनजवळीत पश्चिम उत्तर प्रदेशातील जिल्हा आहे. इतक्या लांबून हिमालयाचं शिखरं दिसू लागल्याने सहारनपूर जिल्ह्यातील आयकर अधिकरी दुष्यंत सिंह यांना आश्चर्य वाटलं.दुष्यंत सिंह यांनी आपल्या कॅमेऱ्यात तात्काळ हे  फोटो काढले आहे. दुष्यंत यांनी आपल्या वसंत विहार कॉलनीतून हे फोटो क्लिक केले. हिमालयातील गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा प्रदूषणात घट झाल्याने स्पष्ट दिसू लागल्या आहेत. हे फोटो दुष्यंत सिंह यांनी २० मे रोजी काढले आहेत. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

 

“मागच्या लॉकडाउनमध्येही हिमालयातील पर्वतरांगा दिसत होत्या. मात्र यावेळी गंगोत्री, यमुनोत्री आणि शिवलिक पर्वतरांगा स्पष्ट दिसत आहेत”, असं दुष्यंत सिंह यांनी सांगितलं.हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

 

Exit mobile version