Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लैंगिक अत्याचार करणाऱ्याला पाच वर्षे सश्रम कारावास

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास आणि ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात आठ वर्षीय मुलगी आपल्या कुठुंबियांसह वास्तव्याला आहे. ११ ऑक्टोबर २०१६ रोजी पिडीत मुलीच्या घराच्या बाजूला राहणारा लाला मुकर्रर पटेल (वय-५३) याने मुलीला दुकानातून वॉशींग पावडर घेवून आणण्याचे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लाला मुकर्रर पटेल याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे जलद विशेष न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण पाच साक्षिदारांची साक्ष नोंदविण्यात आली यात पिडीत मुलीची आई, पिडीत मुलगी, तपासाधिकारी आणि पंच याची साक्ष महत्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयाने लाला पटेल याला दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास आणि ४५ हजार रूपयांचा दंड, तसेच दंड न भरल्याच पुन्हा ४ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड.चारूलता बोरसे यांनी काम पाहिले.

Exit mobile version