Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लेख : अभियांत्रिकी क्षेत्रच रोजगार निर्मितीमध्ये अग्रेसर

(शैक्षणिक लेख )

वैज्ञानिक, आर्थिक, तांत्रिक व प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्याच्या व वापरण्याच्या कौशल्यांना, व्यवसायांना आणि शास्त्रांना ‘अभियांत्रिकी’ असे म्हटले जाते. सामान्यपणे विज्ञानाच्या प्रत्यक्षातल्या उपयोगाला ‘अभियांत्रिकी’ म्हटले जाते. बांधकामे, यंत्रे, उपकरणे, पदार्थ, प्रणाली व प्रक्रिया यांचे आराखडे व निर्मिती करणे ही अभियांत्रिकीची प्रमुख कार्ये आहेत. यासाठी गणिताचा आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांसारख्या विविध विज्ञानांचा उपयोग होतो.

कुशल रोजगारनिर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा दबदबा अजूनही कायम आहे. स्किल इंडियाच्या अहवालानुसार मागील वर्षी कुशल रोजगारनिर्मितीमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा वाटा ५७. ०९ टक्के होता. अभियांत्रिकी हे व्यावसायिक क्षेत्र आहे; विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे सिद्धांत वापरून संशोधन, डिझाइन आणि निर्मिती केली जाते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून व यंत्र, रचना, प्रणाली इत्यादींचा उपयोग करून समाजाच्या समस्या सोडविण्याचे किंवा सामाजिक/वैयक्तिक कार्यपद्धती सोयीस्कर करण्याची कार्ये केली जातात. समाजात असे एकही क्षेत्र नाही; ज्यामध्ये अभियांत्रिकी ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग होत नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी, समाजाभिमुख समस्यांवर संशोधनाची संधी, कामाचे समाधान, रोजगाराच्या उत्कृष्ट आणि विविध संधी, समाजाचे ऋण फेडण्याची संधी, जबाबदारीचे/आव्हानात्मक काम, बौद्धिक विकास, सर्जनशील विचार, तांत्रिक आणि वैज्ञानिक शोध, आर्थिक सुरक्षा, प्रतिष्ठा व्यावसायिक वातावरण यासाठी या विद्याशाखेची निवड विद्यार्थी करतात

अभियांत्रिकी क्षेत्राचा कुशल रोजगारनिर्मितीमध्ये दबदबा असला, तरीही माझा शेजारी, माझ्या बहिणीचा, माझ्या भावाचा मुलगा/मुलगी अभियांत्रिकीनंतर घरीच बसून आहे, काहीही काम (नोकरी) करीत नाही, हे सांगणार्‍यांचे प्रमाणही तुम्हाला लक्षणीय मिळेल.

इंग्रजीमध्ये म्हटले जाते – ‘इंजिनिअर्स आर ड्रीम ऑफ सोसायटी, इंजिनिअर्स आर नीड ऑफ सोसायटी’ या वाक्याची खरी प्रचिती आपण आता ‘कोविडच्या भयंकर महामारीमध्ये घेतलीच असेल. जगाच्या कानाकोपर्‍यांमध्ये इंजिनिअर्स हे कोविड योद्ध्याप्रमाणे वेगवेगळी यंत्रे आणि उपकरणे बनवून जगाला कोरोनापासून वाचविण्याचे काम करीत होते.

भारतामध्येही विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांत रुग्णांकरिता व्हेंटिलेटर बनविले; त्याचप्रमाणे जळगावमध्येही रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात कोरोना व्हायरसपासून कोविड योद्ध्यांचे दैनंदिन उपयोगातील साहित्य निर्जंतुकीकरण करण्यासाठी ई अ‍ॅण्ड टीसी अभियांत्रिकी विभागाकडून यूव्ही-सी बॉक्सची निर्मिती करण्यात आली. यंत्र अभियांत्रिकी विभाग आणि प्रथम वषर्र् अभियांत्रिकी विभागाकडून स्वयंचलित आणि फूट ऑपरेटेड सॅनिटायझर मशिन आणि थ्री डी प्रिंटेड फेस मास्कची निर्मिती केली. उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाविद्यालय संपूर्ण भारताप्रमाणे जळगावमध्येही उपलब्ध आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय फक्त पुणे किंवा मुंबईमध्ये असणे, हे काम उत्तम अभियांत्रिकी शिक्षणाचे मानक आहेत का? नक्कीच नाही. फक्त अभियांत्रिकी पदवी घेण्याकरिता कसलेही मानक विचारात न घेता आपण महाविद्यालयात प्रवेश घेतो, तर चार वर्षांनंतर आपणही दुसर्‍या प्रभागात मोडून उच्चशिक्षित बेरोजगार म्हणूनच राहू.

अभियांत्रिकी क्षेत्र विश्‍वातले एक विस्तृत क्षेत्र आहे; ज्यामध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येक अभियंत्यास मिळू शकते. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या सभोवताली घडण्याच्या सर्व घडामोडींमध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा सहभाग असतोच. सर्व क्षेत्रांत रोजगाराभिमुख योगदान देण्यासाठी काही गोष्टी शिक्षणासोबत अंगीकृत करणे गरजेचे असते.

संख्या कौशल्य, समस्याचे निराकरण करण्याची क्षमता, संभाषण आणि सांघिक कार्यपद्धतीमध्ये योगदान देणे, नेतृत्वक्षमता, सर्जनशीलता हे गुण अभियांत्रिकी कारकिर्दीसाठी महत्वाचे ठरतात

अभियांत्रिकी शिक्षणासाठी महाविद्यालयाची निवड करताना उत्कृष्ट अभ्यासक्रम आणि शिक्षणासाठी निकषानुसार काही मानक तपासणे गरजेचे असतात.
महाविद्यालयाला ‘नॅक’ संस्थेचे मानांकन आहे का? जर आहे तर त्याची ग्रेड काय आहे? ‘अ’ मानांकन असलेले महाविद्यालय आपण चांगले म्हणू. महाविद्यालय हे स्वायत्त आहे की नाही, हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. महाविद्यालय रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देतात की नाही आणि हे पाहणेही महत्त्वाचे ठरते. उत्तर महाराष्ट्र विभागात जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट हा उत्तम पर्याय आहे

 


— प्रा. अंकुश भिष्णूरकर
जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट, जळगाव

Exit mobile version