लीला शिंदे यांची पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापदी निवड

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीला शिंदे यांची निवड करण्यात आले आहे. त्यांचा फाउंडेशनच्यावतीने निवड पत्र प्रदान करून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन कविवर्य बा. भो. बोरकर यांच्या जन्मगावी बोरी- फोंडा गोवा राज्यामध्ये ५ जून २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे. हे संमेलन प्रागतिक विचार मंच पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे या संमेलनाचे अध्यक्षपद राज्य शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ बाल साहित्यिक लीला शिंदे, औरंगाबाद या भूषवणार आहेत. त्यांचे बाल साहित्यावर विविध प्रकारात ३० पुस्तक प्रकाशित आहेत तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री नवदुर्गा संस्थान बोरी फोंडाचे अध्यक्ष श्यामप्रभू देसाई, संमेलनाचे कार्याध्यक्ष सुनील सावकार, माजी सरपंच बोरी- फोंडा सह कार्याध्यक्ष जयवंत आडपईकर अध्यक्ष प्रागतीक विचार मंच पणजी तर संमेलनाचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळवडेकर, सहसंयोजक डॉ. अनिता संतोष तिळवे, गोवा या संमेलनाचे निमंत्रक युवा कामगार नेता अॅड. अजितसिंह राणे यांची निवड करण्यात आलेली आहे. या संमेलनाला गोवा तसेच महाराष्ट्रातून विविध नामवंत साहित्यिक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
ज्येष्ठ बालसाहित्यिक लीला शिंदे यांच्या औरंगाबाद येथील पदमपुरा निवासस्थानी नुकतेच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे, फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख शाहीर मनोहर पवार, जिल्हा विधी सल्लागार तथा सुप्रसिध्द कवी अॅड. विजयकुमार कस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध कथाकार बबनराव महामुने, औरंगाबाद येथील पदाधिकारी अॅड. सर्जेराव साळवे, प्रा. जगदीश वेदपाठक आदींनी ज्येष्ठ बालसाहित्यिक यांनी पहिल्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीचे पत्र प्रदान करून शाल व बुके पुस्तक भेट देऊन लीला शिंदे यांचा सत्कार केला. या संमेलनाला महाराष्ट्रातून शंभर साहित्यिक रसिकांची उपस्थिती लाभणार असल्याचे या संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.

 

Protected Content