Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाच स्वीकारताना हवालदार अटकेत

जळगाव । पाेलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार संभाजी श्यामराव पाटीलला मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदाराला रामानंदनगर पाेलिस ठाण्यात भादंवि कलम ३०७ अन्वये दाखल गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी संभाजी पाटीलने १० हजार रुपयांची लाच मागितली. ती रक्कम स्वीकारत असताना हवालदार पाटीलला रंगेहाथ पकडण्यात अाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पाेलिस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर, पाेलिस निरीक्षक निलेश लाेधी, संजाेग बच्छाव, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुरेश पाटील, सुनील पाटील, पोलिस नाईक मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, काॅन्स्टेबल प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, महेश सोमवंशी, ईश्वर धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Exit mobile version