Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाच लुचपत विभागातर्फे ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’ची सुरुवात

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात दरवर्षी एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे (विजिलन्स अवेरनेस विक) आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने यावर्षी दि. ३१ ऑक्टोबर २०२२ ते दि.०६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव तर्फे दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.

सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता भ्रष्ट्राचार निर्मुलनाची शपथ घेवुन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर मा. राज्यपाल यांनी या सप्ताहनिमित्त दिलेला संदेश वाचन करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार आणि भ्रष्ट पद्धतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जागरुकता मोहिम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपले शासकीय काम करुन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची लाच देण्याची आवश्यकता नाही. परंतु काही वेळेस सर्वसामान्य नागरीकांना असे वाटते की, शासकीय कार्यालयातील काम फक्त लाच दिल्यावरच कार्यान्वीत होते. या धारणेला बदलण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरीक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार नष्ट करण्यास मदत करु शकतात. त्या अनुषंगाने दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरो विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती आणि अंमलबजावणी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जळगांव जिल्ह्यातील शासकीय कार्यालये / शाळा / महाविद्यालये / ग्रामीण भागात भ्रष्टाचाराच्या दृष्टपरिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक नागरीकाने “भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र” घडविण्यास मदत करुन लाच मागणाऱ्याची माहिती तात्काळ द्यावी.

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in / Email- dyspacbjalgaon@gmail.com

फेसबुक – www.facebook.com/MaharashtraACB

मोबाईल ॲप्स – www.acbmaharashtra.net

व्हॉटसअॅप नंबर – ९९३०९९७७०० टोल फ्रि नंबर – *१०६४* अँन्टी करप्शन ब्युरो, कार्यालय, जळगांव, दुरध्वनी नंबर – ०२५७ – २२३५४७७ येथे संपर्क साधावा असे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो विभागाचे पोलिस उप अधीक्षक एस. एस. पाटील यांनी तमाम नागरिकांना केले आहे.

Exit mobile version