Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाचखोर कार्यालय अधिक्षक एसीबीच्या जाळ्यात; धुळे पथकाची कारवाई

एरंडोल प्रतिनिधी । नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे नोटीस न काढता लिलावात ताब्यात द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या नगरपालिका दुकान संकुलातील करार संपल्याने सील केलेले  गाळे लिलावामध्ये ताब्यात देवून तसेच तक्रार यांच्या इतर गाळ्यांना नोटीस न देण्यासाठी कर निर्धारण व प्रशासकीय विभागातील कार्यालय अधिक्षक  संजय दगडू ढमाळ (वय-५१) रा. म्हाडा कॉलनी अमळनेर यांनी दोन लाख रूपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रूपये देण्याचे ठरले. दरम्यान तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार आज लाचलुचपत विभागाने दुपारी सापळा रचून संशयित आरोपी संजय ढमाळ यांनी दीड लाख रूपये स्विकारतांना रंगेहात पकडले. याप्रकरणी एरंडोल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

ही कारवाई धुळे एसीबी उपअधिक्षक सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर सोनवणे, संतोष हिरे , कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, राजन कदम,सुधीर मोरे यांनी केली.

Exit mobile version