Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लाकूडनंतर आता डिंक तस्कारांवर देखील पथकाची कारवाई !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर वनविभागातून डींकाची तस्करी करणाऱ्यावर देखिल वनविभागाने धडक कारवाई केली आहे.यात ४५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ताब्यात घेतला आहे. वन विभागाच्या या सततच्या कारवायांमुळे लाकुड व डींक तस्कर कमालीचे भयभीत झाले आहे.

रावेर वनविभागात सुरु असलेल्या धडक करवायामुळे आरएफओ अजय बावणे चांगलेच चर्चेत आले आहे.त्यांनी केलेल्या करवायामुळे वृक्षप्रेमी मधुन त्यांचे कौतुक होत.ब-याच वर्षानी रावेर वनविभागात कर्तव्य दक्ष अधिकारी लाभल्याचा सुर जनमानसात उमटत आहे. रविवारी २६ फेब्रुवारी रोजी यावल विभागाचे दिगंबर पगार, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी परिक्षेत्र रावेर मधील वनकर्मचारीसह सापळा रचून कारवाई केली.

यावल तालुक्यातीलमोरव्हाल ते जिन्सी रस्ता जिन्सी तांडाजवळ अवैद्य गौण वनउपज (धावडा डिंक) वाहतूक करतांना दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीजी ६६५) ची चौकशी केली असतांना ३० हजार रूपये किंमतीचे ५५किलो डिंग, आणि १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली आहे. याप्रकरणी वनविभागाच्या विविध कलमान्वये संशयित आरोपी अमीर सुभान तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, वनपाल पाल, अरुणा ढेपले, वनरक्षक जिन्सी रमेश भुतेक यांनी केली आहे. पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे.

Exit mobile version