लाकडाची तस्करी करणारा ट्रक पकडला

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लिंब लाकडांची अवैध तस्करी करणाऱ्या ट्रकवर रावेर वनविभागाने धडाकेबाज कारवाई केल्याने लाकुड तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रावेर परिसरातुन बुऱ्हाणपूर मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होत असल्याची ओरड असतांना केलेल्या कारवाईमुळे तस्करांमध्ये धडकी भरली आहे.

वन विभागाच्या सूत्रांकडून समजलेल्या माहीती नुसार, रविवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे रसलपुर ते रावेर रस्त्याने विना परवाना जळावू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ७८६२) ट्रक किंमत अंदाजे ३ लाख १२ बारा हजार रूपये किंमतीचे जळावून सरपणजप्त करण्यात आले. सदर वाहन चालक शेख कलीम शेख कबीर रा.रावेर यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वय प्रथम रिपोर्ट क्रमांक ०१/२०२३ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास वनपाल रावेर करीत आहे. ही सर्व कार्यवाही वनसंरक्षकधुळे (प्रा.) दिगंबर पगार उपवनसंरक्षक यावल .जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे वनपाल रावेर रवींद्र सोनवणे, वनपाल पाल अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content