Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लहान मुलांसाठीची कोरोना लस ऑक्टोबरपर्यंत तयार होणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या प्रादुर्भावातून लहान मुलांना वाचवण्यासाठी आता लवकरच कोरोनाची लस तयार होणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं हा दावा केला आहे.एक्सिम ग्रुपचे संचालक पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल ही लस १ महिन्याच्या बाळालाही दिली जाऊ शकणार आहे.

कोचीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नांबियार यांनी सांगितलं की ही लस आल्यानंतर मुलांना मोठा फायदा होणार आहे. ही लस पुढे चालून लहान मुलांसाठी कोरोनावरील औषध म्हणूनही काम करेल, असंही नांबियार म्हणाले. म्हणजे लहान मुलाला कोरोनाची बाधा झाली असेल तर ही लस तुम्हाला कोरोनापासून वाचवेल.

या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नियोजनानुसार सर्वकाही ठीक पार पडलं तर ऑक्टोबरपर्यंत लस तयार होईल आणि वर्षाच्या अखेरपर्यंत ती मुलांना देण्यास सुरुवात होईल. नांबियार यांच्या म्हणण्यानुसार कोव्हिशील्ड ही लस मलेरियावर आधारित लस आहे. त्यामुळे ही लस कोरोनाच्या लक्षणांसाठीही फायदेशीर ठरेल. सरकारला गरज भासली तर एप्रिलपर्यंत लसीचे २० कोटी डोस बनवू, असंही नांबियार म्हणाले. लस घेतल्यानंतर थोडा ताप आणि डोकेदुखी होणं ही सामान्य बाब असल्याचंही नांबियार यांनी सांगितलं. त्याशिवाय अन्य कुठल्याही साईड इफेक्ट्सच्या चर्चा नांबियार यांनी फेटाळल्या आहेत.

Exit mobile version