Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून महिलेला दोघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून २८ वर्षीय विवाहितेला दोन जणांनी विळा मारून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव तालुक्यातील आसोदा गावात कविता रविंद्र कोळी या महिला आल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारे मंगला विलास सोनवणे आणि विलास सोनवणे या दोघांनी शिवीगाळ केली. यात मंगला सोनवणे या महिलेने विवाहितेच्या मांडीला विळा मारून गंभीर जखमी केले. तर विला सोनवणे याने काठी मारून डोक्याला दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी २ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मंगला विलास सोनवणे आणि विलास सोनवणे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version