Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवु नका – पोलिस निरीक्षक किसनराव पाटील

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा शहरातील व परीसरातील नागरीकांना पोलीस प्रशासनाचे वतीने सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासुन व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून लहान मुलांचे अपहरण करणारे टोळी किंवा चोर आले अशा प्रकारच्या अफवा फिरत आहे.

अशा अफवा मुळे इतर जिल्ह्यात जमावाकडुन बहरूपी, वाटसरु, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडलेले आहेत. त्यातून अशा जमावावर गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सध्या पाचोरा शहरात व परीसरात अशा अफवा पसरविल्या जात असून‌ लोकांचे मनात भिती पसरली असल्याचे निदर्शनास आले आहे.

पोलीस प्रशासनाच्या वतीने पाचोरा शहर व परीसरातील जनतेस आवाहन करण्यात येते की‌, अफवावर विश्वास ठेवू नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. बातमीची खात्री केल्या शिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करु नये. सोशल मिडीयातुन आलेल्या मेसेजवर डोळे झाकुन विश्वास ठेवू नका. अफवा पसरविणा-या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलीसांचे लक्ष आहे.

अफवा पसरविल्यास आपणावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. अफवेला बळी पडुन आपल्या हातुन गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:हुन कायदा हातात घेऊ नये. कायदा व सुव्यावस्था आबाधीत राखण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी माध्यमांशी बोलतांना तमाम नागरिकांना केले आहे.

Exit mobile version