Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरण केंद्रावर उसळली गर्दी (व्हिडीओ)

जळगाव राहूल शिरसाळे । शहरात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. या अनुषंगाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. 

 

शहरातील  राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सकाळी   वाजेपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली होती. या केंद्रावर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे.  येथे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सकाळी ६ वाजेपासून टोकन घेण्यासाठी आलो  मात्र, टोकन ९ वाजेपासून वाटप करण्यात आल्याची माहिती  दिली. यावेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नागरिक व नोंदणी न करता थेट केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची स्वतंत्र रांग करण्यात आली होती.   आज शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांनी लसीकरणासाठी  गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आज महापालिकेच्या १० केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी.बी. जैन रुग्णालय, शाहीर अमर शेख, का. ऊ. कोल्हे विद्यालय, मनपा शाळा क्र. ४८ या पाच केंद्रांवर १८-४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस  उपलब्ध करून देण्यात आला.  कांताई नेत्रालय येथे  १८-४४ वयोगटासाठी पहिला डोस व ४५ वर्षापासून पुढेंसाठी दुसरा डोस उपलब्ध आहे.  नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल येथे कोविशील्डचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला. चेतनदास मेहता हॉस्पिटलमध्ये १८-४४ व ४५च्या पुढील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस  देण्यात येत आहे.

 

 

 

Exit mobile version