Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींवरील टीका दुर्दैवी : डॉ. कुंदन फेगडे (व्हिडिओ)

यावल, अय्युब पटेल | भारत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा १०० कोटीचा टप्पा पार करणारा दुसरा देश बनला असून ही ऐतिहासिक कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली करण्यात आलेली असताना त्यांच्यावर टीका होणे दुर्दैवी असल्याचे भाजप वैद्यकीय आघाडीचे विशेष आमंत्रीत समन्वयक, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी सांगितले.

 

डॉ. कुंदन फेगडे यांनी पुढे सांगितले की ६ जानेवारीला २०२१ ला लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. आज १०० कोटी लसीकरण करणाऱ्यांमध्ये केवळ चीन व भारताचा समावेश आहे. कोरोना विषाणूचा प्रसार हा चीन मधून झाला होता. यामुळे चीनकडे याबाबत माहिती व संसोधन आधी पासून सुरु होते. मात्र, हा विषाणू आल्यानंतर संपूर्ण जगात लस बनविण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. कोरोना प्रतिबंधक लस कोण बनवतो याकडे सर्व जगाचे लक्ष लागून होते. मात्र, मोजके काही देश सोडल्यास भारताने पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने स्वदेशी कोव्हॅकसीन व कोविसील्ड या दोन लस उत्पादित केले. १०० कोटींचा लसीकरण टप्पा पूर्ण केला असून तो लवकरच १८८ कोटींचा टप्पा पार पडले असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. या काळात कोरोना योद्ध्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले असल्याचे सांगितले.

 

Exit mobile version