Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लसींची निर्यात थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले आहे की, आवश्यकता असलेल्या प्रत्येकाला लसीकरण झाले पाहिजे आणि तत्काळ लसींची निर्यातीवर बंदी आणली गेली पाहिजे.  अन्य लसी देखील जलगतीने उपलब्ध व्हायला हव्यात.

 

देशात एकीकडे दिवसेंदिवस  कोरोनाचा संसर्ग वाढत असून, दुसरीकडे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत आता काहीसे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. कारण, पुरेसा लसींचा साठ नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेलाच ब्रेक लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

 

 

 

वाढत्या  संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, उत्सव नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्व राज्यांना भेदभाव न करता मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे. असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

 

 

, शास्त्रज्ञांचे कष्ट आणि लस निर्मात्यांच्या प्रयत्नांना केंद्रची कमकुवत अंमलबजावणी आणि देखरखीमुळे फटक बसल्याचाही राहुल गांधींनी आरोप केला आहे.

 

याशिवाय राहुल गांधींनी देशात बाधितांच्या संख्येतील विक्रमी वाढ आणि केंद्र सरकार व काही राज्यांमध्ये लसींचा पुरवठ्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर देखील पत्रात लिहिले आहे.

Exit mobile version