Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लष्करे इंडस्ट्रीजमध्ये प्लॉस्टिकच्या कच्च्या मटेरियलला आग

 

 

 

जळगाव प्रतिनिधी ।  वेल्डींगचे काम करत असतांना ठिबकसाठीच्या  प्लॅस्टीकच्या कच्चे मटेरीयलवर ठिणग्या पडल्याने लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना एमआयडीसीतील जे-सेक्टरमधील लष्करे इंडस्ट्रीजमध्ये १० मार्च रोजी सायंकाळी घडली.

 

महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले .

 

कंपनीच्या मालक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रतिलाल लष्करे (वय-३०,  रा. मेहरूण ) यांची एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये लष्करे इंडस्ट्रिज नावाची ठिबक नळ्यांची कंपनी आहे. कंपनीत ठिबक नळ्या बनविण्यासाठी कच्चा व पक्के प्लास्टिकचे मटेरियल वापरले जाते. दरम्यान कंपनीच्या आवारात ग्राईंडर केलेले प्लास्टिकचे कच्चे मटेरियल ठेवले होते. १० मार्च रोजी  कंपनीच्या बाजुला असलेल्या चटई कंपनीत लोखंडी जिना बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी वेल्डिंगचे काम सुरू असतांना वेल्डिंगची ठिणगी पडली. त्यात प्लास्टिकच्या कच्चा मालाने पेट घेतला. काही कळण्याच्या आत तत्काळ आगीने पेट घेतला. यात सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्यात यश आले. एमआयडीसी पोलीसात नोंद घेण्यात आली आहे.

 

Exit mobile version