Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लव्ह जिहाद कायद्यानुसार उत्तरप्रदेशात पहिली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लव्ह जिहाद विरोधात उत्तर प्रदेशात तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपी ओवैस अहमदला अटक करण्यात आली.

हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा व मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा ओवैस अहमदवर आरोप आहे.

आरोपी ओवैस अहमद काही दिवसांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते. आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020’ अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

ओवैसचे एका हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. ओवैसला त्यावेळी अटक झाली होती. मुलीच्या वडिलानी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. पण मुलीने तो आरोप फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले.

मुलीच्या वडिलांनी रविवारी एफआयआर नोंदवला. ओवैस दबाव टाकून आपल्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. तो आमच्या कुटुंबाला सुद्धा धमकावत होता असा आरोप मुलीच्या वडिलांनी केली आहे.

“मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून ओवैस मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. मुलीला परत बोलवा. मुलीने धर्मांतर केल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत आहे” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नव्या कायद्यातंर्गत १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Exit mobile version