Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवकर बरे व्हा ; नाथाभाऊंच्या फडणवीसांना सदिच्छा

नाशिक : वृत्तसंस्था । देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“मी टीव्हीवर फडणवीसांना कोरोना झाल्याचं पाहिलं. त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा,” असं खडसे यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी ट्विट करत संसर्ग झाला असल्याची माहिती दिली आहे.

एकनाथ खडसे यांनी यावेळी आता आपल्या डोक्यावरील टेन्शन कमी झालं असून इतरांना टेन्शन देण्याचं सुरु करणार आहे असा इशारा भाजपाला दिला. आपल्याला साधा कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादीत काम करायला आवडेल असंही सांगितलं. “भाजपातील अनेक आमदार माझ्या संपर्कात आहे. मात्र पक्षबंदी कायद्यामुळे अनेक अडचणी आहेत,” असं खडसेंनी सांगितलं.

“भाजपला शेटजी भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती. मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन पुसण्याचा प्रयत्न केला. मी २०१४ नंतर बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालं आहे हे मान्यचं करावं लागेल,” असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Exit mobile version