Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवकरच होणार मंत्रीमंडळाचा विस्तार ! : फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अपात्रता प्रकरणी कोर्टातील सुनावणीचा मंत्रीमंडळ विस्ताराशी काहीही संबंध नसल्याचे नमूद करत लवकरच मंत्री शपथविधी घेतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकांवरील एकत्रीत सुनावणी आज सुप्रीम कोर्टात झाली. यानंतर या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात यावी असे निर्देश खंडपीठाने दिले. या अनुषंगाने सदर निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, न्यायालयाच्या निकालाबाबत आजच सांगता येणार नसले तरी आज आम्ही कोर्टासमोर अतिशय प्रभावी युक्तीवाद केला आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केव्हा होणार ? या प्रश्‍नावर ते म्हणाले की, अपात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी आणि विस्तार यांचा काही एक संबंध नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसह इतर महत्वाचे प्रश्‍न असल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. तथापि, लवकरच आमचे मंत्री शपथ घेतील असे फडणवीस म्हणाले.

Exit mobile version