Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लमांजन येथे तरूणाला लाकडी दांडुक्याने बेदम मारहाण; एमआयडीसीत चौघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना घराच्या बाहेर ओट्यावर बसलेल्या तरूणाला चार जणांनी शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांडुक्याने डोक्याला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना तालुक्यातील लमांजन गावात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, गजानन महादू पाटील (वय-३४) रा. लमांजन ता.जि.जळगाव हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. रविवार ७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या ओट्यावर मित्र नवल साहेबराव पाटील असे दोघे बसलेले होते. त्यावेळी गावातील बापु भिवसन पाटील, कैलास भिवसन पाटील, अरूण कैलास पाटील, अविनाश बापू पाटील यांनी काहीही कारण नसतांना गजानन पाटील आणि संतोष पाटील यांना कुऱ्हाडीच्या दांडुक्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवदास चौधरी करीत आहे.

Exit mobile version