Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लपूनछपून व्यवसाय करणे पडले महागात : १७ दुकाने सील (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना  काही इतर व्यावसायिक लपूनछपून व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा १७  दुकानांना सील लावण्याची कारवाई आज मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दुकाने सील करण्याची कारवाई मनपाच्या पथकाद्वारे करण्यात येत आहे. यात काही व्यावसायिक आपल्या दुकानाचे शटर बंद करून आत व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. यावेळी ग्राहक देखील आतमध्ये असल्याचे आढळून आले.  अशा प्रकारे व्यवसाय करणारे १७ दुकाने सील करण्यात आली आहे. यात १० दुकाने ही सिंधी कॉलनी परिसरातील तर उर्वरित  बोहरा गल्ली, बळीराम पेठ, सोनाळकर कॉम्प्लेक्स येथील असून या सर्व  दुकानांना सील करून त्यांना नोटीसा बजावून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मागर्दर्शनाखाली अतिक्रमण विभागातील संजय ठाकूर, सुनील पवार, किशोर सोनवणे, नाना कोळी, नितीन भालेराव, राहुल कापरे, सलमान भिस्ती व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

 

 

 

 

Exit mobile version